सोशल मीडियावरील बदनामीला आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नउत्तरांच्या तासात सांगितले.

 # विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (अ) सारख्या तरतुदीमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने बदल केले आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून, सध्याच्या परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात यंईल. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागत असला, तरी महिलांना होणारा त्रास विशेषतः गंभीर आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कायद्यात ठोस तरतुदी सुचवण्याचे निर्देश समितीला देण्यात येतील. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

  • Related Posts

    शांततेत दडलेला थरार ! ‘बोल बोल राणी’ 10 जुलैला होणार प्रदर्शित

    सिड विंचुरकर निर्मित, दिग्दर्शित ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून येत्या १० जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये…

    ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    ठाणे (दि.16) : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य इंधन टंचाईच्या काळात, ठाणे जिल्ह्यातील एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळावे, यासाठी जिल्हा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *