
ठाणे (19) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आली. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजल्यापासून ते दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत शहरातील एकूण 3778 अनधिकृत पोस्टर्स, भित्तीपत्रके व बॅनर्स हटविण्यात आले आहेत.
दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त् सोपान भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समित्यांमधील पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत अनधिकृत बॅनर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज, भित्तीपत्रके व पोस्टर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींची नावे असलेल्या विकासकामांच्या कोनशीला झाकण्याची कार्यवाही महापालिकेच्यावतीने करण्यात आली.
ठाणे शहरातील 9 प्रभागसमितीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 630 भित्तीपत्रके, 897 पोस्टर्स, 83 कटआऊटस्, 1266 बॅनर्स, 602 फ्लॅग अशा एकूण 3778 अनधिकृत जाहिराती हटविण्यात आल्या.
15 डिसेंबर 2025 ते 18डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईचा प्रभागनिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
नौपाडा–कोपरी प्रभाग समिती – 754
वागळे प्रभाग समिती – 512
लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – 508
वर्तकनगर प्रभाग समिती – 483
माजिवडा–मानपाडा प्रभाग समिती – 327
उथळसर प्रभाग समिती – 707
कळवा प्रभाग समिती – 76
मुंब्रा प्रभाग समिती – 179
दिवा प्रभाग समिती – 232