
सप्टेंबर २०२५ मध्ये गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील जीरा गावातील उद्योजक बाबुभाई जिरावाला यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्ताने संपूर्ण गाव कर्जमुक्त केले.
२९० शेतकऱ्यांचे सुमारे ₹९० लाख रुपयांचे कर्ज त्यांनी स्वतःच्या निधीतून फेडले.
हा उपक्रम केवळ दान नाही, तर विश्वस्त भावनेतून उभे राहिलेले करुणामय भांडवलशाहीचे जिवंत उदाहरण आहे.
कर्जमुक्त भारतासाठी संकल्प
प्रत्येक शेतकरी आणि ग्रामपंचायत कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांपासून सुरुवात करून अमरेली मॉडेल सर्व जिल्ह्यांत राबविणे हे ध्येय.
अभियानाचे प्रमुख टप्पे
• प्रत्येक जिल्ह्यात अमरेली मॉडेलची पुनरावृत्ती.
• उद्योगपती, कॉर्पोरेट संस्था आणि NRI भारतीयांना गाव दत्तक घेण्यास प्रोत्साहन.
• शेतकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि आत्मनिर्भरता वाढविणे.
• बँका, शासन आणि नागरिक यांच्यात भागीदारी निर्माण करणे.
• कर्जमाफीऐवजी सामूहिक कर्जमुक्ती चळवळ उभारणे.
संगमनितीचा संदेश
“विश्वस्ततेच्या भावनेतून समृद्धी,
आत्मनिर्भरतेतून स्वातंत्र्य,
आणि सामूहिक प्रयत्नातून कर्जमुक्त भारत.”
: संगम लाल (लेखक : “चार्टर्ड अकाउंटंट” )