
ठाणे | सुदामा रेसिडेन्सी बाजूला, खर्डीगाव, दिवा – शीळ रोड, दिवा (पू.), ठाणे याठिकाणी टोरंट पॉवर कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर कबुतर अडकल्याची वर्दी प्राप्त झाल्यानंतर दिवा बीट अग्निशमन केंद्राचे जवान 1 रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहचले.
दरम्यान कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या 2 जवानांना ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का बसल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांची माहिती खालीलप्रमाणे:
1) उत्सव पाटील (पु / 28 वर्षे / राहणार – आगासन गाव, दिवा) यांचा मृत्यू झाला असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
2) आझाद पाटील (पु / 29 वर्षे / राहणार – वाडा, पालघर) यांना हाताला व छातीला भाजले आहे.
Please Share and like us: