
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून वाहतुकीचा नियमांची जनजागृती करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी खरे केंद्र बिंदू आहेत.:विभागीय रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी
कल्याण( प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा शिक्षण विभाग व ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्तालय अंतर्गत “सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स” व “युनिसेफ” यांच्या संयुक्त विद्यमाने,वाहतूक पोलिस उपायुक्त माननीय पंकज शिरसाट यांचा मार्गदर्शनाखाली “रस्ते सुरक्षा” विषयावर एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.हे प्रशिक्षण गोवेली (ता. कल्याण) येथील मार थोमा विद्यापीठ शाळेत पार पडले. या कार्यशाळेसाठी रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मनिलाल शिंपी, कल्याण आर टी ओ चे मोटर वाहन निरीक्षक श्री. प्रशांत देवणे, टिटवाळा पोलिस ठाण्याचे ए. पी.आय. रणजीत दोरकर, पोलिस निरीक्षक योगेश साळोखे, आरोग्य उपकेंद्र गोवेली येथील डॉ. रेणू तिलोकचांदणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेत जिल्हा परिषद शाळा तसेच विविध संस्थांतर्गत चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम शाळांमधील शिक्षक-शिक्षिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रशिक्षणात मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांची कारणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर, वाहनांची देखभाल यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता वाढविणे व शाळा सुरक्षा समिती स्थापन करून शाळा परिसरातील त्रुटींचे ऑडिट करणे किती आवश्यक आहे, यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमास रस्ते सुरक्षा विभागाच्या आरएसपी शाखेचे ठाणे-पालघर विभाग प्रमुख मनिलाल शिंपी यांनी रस्ता सुरक्षा बाबत बोलताना सांगितले की, आपल्या देशात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ,संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे पालन करणे, रस्ता सुरक्षा बद्दल समाजांमध्ये जनजागृती करणे यासाठी प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करणे. आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तयार करून राज्यातील शिक्षकांमार्फत समाजामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजय शेंडे, उपाध्यक्ष पी एस महाजन,पोहरे सर, श्याम फाळके, विभागीय समन्वय अधिकारी, व विभागीय समादेशक दिलीप स्वामी,तसेच आर एस पी संघटनेचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत असून त्यासाठी शिक्षक बंधू भगिनी यांनी शिक्षण विभाग व पोलिस विभाग( गृह खाते) अंतर्गत आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांमार्फत समाजामध्ये वाहतूक नियमांचे पालन केले जावे,
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.कारण अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक बंधू केंद्रबिंदू आहेत. असे सांगितले.कल्याण आर टी ओ चे मोटर वाहन निरीक्षक प्रशांत देवणे यांनीही महत्वपूर्ण माहिती देताना सांगितले की प्रत्येक बाईक स्वाराने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे , कार चालवताना सीटबेल्ट चा वापर करून वाहतूक नियम पाळावेत असे आवाहन केले .