
ठाणे, (दि.08 ) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे / पालघर यांच्या कार्यक्षेत्रात नोंदणीकृत माजी सैनिक / माजी सैनिक विधवा, युध्द विधवा व त्यांच्यावर अवलंबित ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शालांत परिक्षा (इ.10 वी) उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (इ.12 वी), डिप्लोमा आणि पदवी परिक्षेमध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत, अशी पाल्य शिष्यवृत्ती मिळण्याकरिता पात्र आहेत.
पात्र माजी सैनिकांनी शिष्यवृत्ती मिळण्यारिता .15 ऑक्टोबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२-२५३४३१७४ /९९२००१६५८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ठाणे/पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (नि.) यांनी केले आहे.