
ठाणे (दि.14 ) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी दि.1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि.31 जानेवारी 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि.19 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळ मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 14, 2025राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 14, 202531 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 2025 च्या कक्ष कार्यालयाचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उदघाटन
ताज्या बातम्याJuly 13, 2025“पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न
ताज्या बातम्याJuly 13, 2025 ‘महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक-2024’ विधानपरिषदेत मंजूर