
ठाणे (दि. 11 ) : ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.11 जुलै 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेतील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे सकाळी 10 वाजता “पत्रकारितेची पाठशाळा-बातमी मागची गोष्ट” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत निवृत्त संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ, मोटिव्हेशनल स्पिकर डॉ.मोना पंकज व पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक (माहिती) अर्चना शंभरकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे हे उपस्थित राहणार असून शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास म्हापदी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तरी, या कार्यशाळेस ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी केले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 11, 2025ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
ताज्या बातम्याJuly 10, 2025ठाणे महापालिका चषक 31व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, 10 ऑगस्ट रोजी आयोजन
ताज्या बातम्याJuly 10, 2025विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात 10% सवलत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या बातम्याJuly 10, 2025ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु