
ठाणे (दि.10) : ठाणे येथे युध्द विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या मुलांसाठी सर्वसोयींनी युक्त असे वसतिगृह, ज्ञानसाधना कॉलेज मागे, धर्मवीर नगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) या ठिकाणी कार्यरत आहे.
सैनिकी मुलांचे वसतीगृह ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या युध्दविधवा पाल्य, माजी सैनिक विधवा पाल्य, युध्दात जखमी झालेले माजी सैनिकांचे पाल्य, माजी सैनिक पाल्य व सेवारत सैनिक पाल्य यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. प्रवेश पुस्तिका विक्री दि.01 जुलै 2025 पासून सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे येथे सुरु आहे.
सोमवार, दि.28 जुलै 2025, सांयकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया बुधवार, दि.30 जुलै 2025 रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे येथे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. यावेळी अर्ज सादर कलेले विद्यार्थी/पालक यांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीकरिता सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे, मो. 9769664830, 9325307689, 9819786350 येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 11, 2025ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
ताज्या बातम्याJuly 10, 2025ठाणे महापालिका चषक 31व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, 10 ऑगस्ट रोजी आयोजन
ताज्या बातम्याJuly 10, 2025विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात 10% सवलत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या बातम्याJuly 10, 2025ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु