
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्याकरिता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD., एजन्सीची नियुक्ती केली असून HSRP बुकिंग पोर्टल लिंक/URL https://hsrpmhzone२.in आहे व दि.1 जानेवारी 2025 पासून हे काम सुरु झाले आहे.
परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या परिपत्रकान्वये जुन्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडून दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तसेच दि.15 ऑगस्ट 2025 पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित