
- इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशन मार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सीएसआर निधीतून राबला जातो प्रकल्प
- गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना प्रकल्पाला भेट देण्याची संधी
ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनमार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सीएसआर निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे. मुख्यालयाच्या आवारात या उपक्रमांतर्गत प्रत्येकी ४०० लिटर क्षमतेचे चार कंपोस्टिंग एअरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत. या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी दिली आहे.
कचरा निर्माण होणाऱ्या आवारातच कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले.
गृहसंकुलांना प्रतिनिधींना प्रकल्प पाहण्याची संधी
एसओआरटी (Segregation of Waste for Recycling and Treatment) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, एक संस्था आणि २० मोठ्या कचरा उत्पादक गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एअरोबिन दिले जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार प्रत्येक मोठ्या कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने ज्या गृह संकुलांत अशाप्रकारे खत निर्मिती करण्याची इच्छा आहे, अशा गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळी भेट द्यावी.
येथे नोंदणी करावी
प्रकल्पाला भेट देण्याची वेळ ठरवण्यासाठी https://forms.gle/DJ2zuhxx83S3aBsD9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित