
भारतीय सिनेमा क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरणार — व्हिजनरी निर्माते नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ — आजपर्यंतची सर्वात मोठी आणि भव्य फिल्म मानली जात आहे. भारतीय संस्कृतीतील सर्वात पूज्य महाकाव्याला नव्या दृष्टिकोनातून आणि भव्यतेने सादर करणारा हा चित्रपट दररोज प्रेक्षकांच्या मनात अधिकाधिक स्थान निर्माण करत आहे.
ही निर्मिती केवळ एक चित्रपट नसून, भारतीय सिनेमा जगताला जागतिक स्तरावर एका नव्या ओळखीची दिशा देणारा एक ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे.
आता या महाकाव्याची पहिली अधिकृत झलक प्रेक्षकांसमोर येणार आहे . ३ जुलै २०२५ रोजी.
‘रामायण: द इंट्रोडक्शन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अॅनाउन्समेंट प्रोमोचे एकाच वेळी मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची या भारतातील ९ प्रमुख शहरांमध्ये भव्य लॉन्च होणार आहे.
हा प्रोमो केवळ एका नव्या सिनेमा प्रवासाची सुरुवात नसून, प्रेक्षकांना रामायणाच्या अद्वितीय आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या विश्वाची पहिली झलक देणार आहे.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली जात असलेली ही कलाकृती, नमित मल्होत्रा यांची प्राइम फोकस स्टुडिओज आणि ८ वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, तसेच सुपरस्टार यश यांची मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहनिर्मितीत तयार होत आहे.
या त्रैभागी महाकाव्याचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.