
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमिर खानची नवी चित्रपट “सितारे जमीन पर” अखेर २० जून २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली असून, याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक “तारे जमीन पर”चा स्पिरिचुअल सिक्वेल मानला जात असून, त्याची कथा प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी आहे.
चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला असून, ₹ ११.७ कोटींचा जबरदस्त ओपनिंग डे कलेक्शन नोंदवण्यात आला आहे. सकारात्मक प्रतिक्रिया, तोंडी प्रसार (माउथ-ऑफ-वर्ड) आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. वीकेंड जवळ येत असताना, या कमाईत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे १० नवोदित कलाकारांचे भव्य पदार्पण होत आहे. हे कलाकार म्हणजे – अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. या नव्या चेहऱ्यांनी चित्रपटाच्या उत्सवाला अधिकच रंगत आणली आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJune 30, 2025हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द
ताज्या बातम्याJune 28, 2025शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
ताज्या बातम्याJune 28, 2025मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मितीठाण्यात’ होणार
ताज्या बातम्याJune 27, 2025घोडबंदर रोडवरील सिग्लनपाशी रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार