कामगार दीना निमित्ताने घरेलू कामगार बगिनींनी कामगार मित्र आमदार संजय केळकर यांची ठाण्याच्या विश्रामगृहाबाहेर भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आ. केळकर यांनी भेट द्यावी म्हणून त्यांनी विनंती केली होती. यावेळी या घरेलू कामगारांना शुभेच्छापर केळकर यांनी पुष्प दिले.
केळकर हे नेहमीच कामगारांच्या पाठीशी ठाम उभे राहतात.कामगारांचे आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे.
आंतरराष्ट्रीय श्रम संघटन (ILO) ने, 16 जून हा जागतिक घरकामगार दिन म्हणून घोषित केला आहे. 8 मार्च जागतिक महिला दिना प्रमाणे 16 जून हा जागतिक घर कामगार दिन घरकामगार महिला देशभर साजरा करतात. या वर्षीच्या जागतिक घरकामगार दिनाचे महत्व हे आहे की, या वर्षी 29 जानेवारी 2025 रोजी आपल्या मा. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील घर कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिला आहे.
या निवाड्याने घरकामगार महीलांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे. या आनंदी निवाड्याचे स्वागत यावेळी या घरेलू कामगारांसोबत आ. केळकर यांनी उपस्थित राहून केले. यावेळी या कामगारांसोबत विविध विषयांवर केळकर यांनी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी कल्याण परीसरातील 300 घरकामगार महीला 16 जून जागतिक घरकामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी साखळी द्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या जागतिक घरकामगार दिनाचा संदेश जनतेत पोहचविणार आहेत.
या घरेलू कामगार महिलांना आ. केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना सुविधा मिळाव्यात मग त्यांच्या पेन्शन बाबत, किमान वेतन बाबत वा सुरक्षतते बाबत प्रयत्नशील असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित