सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुलांची -4 व मुलींची-4 अशी एकूण-8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व इतर मागास प्रवर्गातील रिक्त असलेल्या जागांवर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश देण्यासाठी महाआयटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील शालेय, कनिष्ठ /वरीष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसयिक / बिगर व्यावसयिक अभ्यासक्रम जसे की, बी.ए.बी.कॉम. / बी.एस.सी, पदवीका / पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर रिक्त जागांवर निकषानुसार प्रवेश देण्यात येईल. विशेष म्हणजे या पोर्टलवर वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. वसतिगृहासाठी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना आपोआप वसतिगृहात प्रवेश न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्यांची नोंद होईल. त्यानंतर त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळेल.
अडचण वाटत असेल तर मार्गदर्शन घ्या…
त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मुलां/ मुलीच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org प्रस्तुत लिंकचा वापर करून अर्ज भरावे, काही अडचण उद्भवल्यास स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आव्हान, समाज कल्याण ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.