आमदार आपल्या दारी’ या जनसंवाद उपक्रमा अंतर्गत ठाणे शहर जेष्ठ आमदार जनसेवक श्री. संजय केळकर साहेब प्रत्यक्ष सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्याशी सुसंवाद साधतात व जनतेच्या समस्या ऐकून घेतात. आमदार केळकर यांचा २५३ वा ‘आमदार आपल्या दारी’ हा कार्यक्रम रविवार 8 जुन 2025 रोजी स्वस्तिक पाल्म्स् सोसायटी, ब्रह्मांड ठाणे येथे रविवारी पार पडला.

समाजसेवक, ब्रह्मांड कट्टा संस्थेचे संस्थापक व भाजपा ठाणे शहर मा.उपाध्यक्ष व एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाचे संयोजक राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आसपासचा परिसर व ठाणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी गृहसंकुल विषयक समस्या, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते वाहतूक, स्त्रिया व लहान मुले यांची दैनंदिन सुरक्षितता, व्यसनी गर्दुल्यांची गृहसंकुल परिसरातील वाढती संख्या, आरोग्य व्यवस्था, सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याचा निचरा, सांस्कृतिक उपक्रमांसाठी सभागृह व कलादालन अशा अनेक मागण्या व समस्या आमदार केळकर साहेबांससमोर मांडल्या. आमदार केळकर यांनी सर्व अर्ज स्वीकारले व त्यानंतर प्रत्येक अर्जावर उपस्थितांशी थोडक्यात चर्चा केली.
ब्रह्मांडचे रहिवासी असलेले ज्येष्ठ साहित्यकार कै. दाजीशास्त्री पणशीकर यांचे नुकतिच देवाज्ञा झाली. ब्रह्मांड परिसरात सांस्कृतिक केंद्र उभारून त्यास दाजी शास्त्री पणशीकरांचे नाव द्यावे असा अर्ज प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर व राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील रहिवाशांतर्फे देण्यात आला. या सर्व अर्जांवर सखोल अभ्यास करून त्यावर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आमदार केळकर यांनी दिले.
याप्रसंगी मा. नगरसेवक मनोहर डुंबरे, विकास पाटील, स्वप्नाली साळवी, रवी रेड्डी, महेश जोशी, अनंत पाटील, वर्षा गंद्रे, ऋजुता देशपांडे, स्नेहल जोशी, महेंद्र देशमुख, व्ही. शिवकुमार, सुहास भाकरे, विजराज बोधनकार, बापू भोगटे, तुकाराम पवार, रोहित प्रभू, उषा रायचौधरी, एस. आर. यादव, प्रा.अनिल आठवले, पांडुरंग पट्टेकर, दिनकर वाघमारे, प्रगती जाधव, सुनील नरे तसेच परिसरातील सोसायटी पदाधिकारी, सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
: www.thaneradio.com