
ठाणे (दि. 19) : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार 21 मे, 2025 रोजी सकाळी 9:00 वाजल्यापासून रात्री 9:00 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत, आवश्यक पाणी साठा करून ते पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ