
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. वर्ष 2024 साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजक, अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील एमएसएमई उद्योजकांना विशेष तरतूदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत, पुरस्कारप्राप्त एमएसएमईंना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) बक्षीस स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.
राष्ट्रीय पुरस्कारांच्या 2024 च्या विविध श्रेणीसाठी एमएसएमईकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दिनांक 14.04.2025 ते 20.05.2025 या कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) द्वारे हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in/) द्वारे देखील त्यांचे अर्ज सादर करू शकतात.
याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई – विकास आणि सुविधा कार्यालय (MSME – DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधू शकतात.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ