
चार शाळांचा निकाल १०० टक्के
ठाणे मार्च – २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत ठाणे महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांचा निकाल ९१.९८ टक्के लागला आहे. गतवर्षी हे प्रमाण ८३.९४ टक्के एवढे होते. या वर्षी महापालिकेच्या चार माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून १३२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक १५, किसननगर, शाळा क्रमांक १६, सावरकर नगर, शाळा क्रमांक १८, ज्ञानसाधना, शाळा क्रमांक १९ सावरकर नगर यांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली.
त्याचबरोबर, महापालिकेच्या चार शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तर, मराठी माध्यमाचा एकूण निकाल ८०.६७ टक्के लागला आहे. रात्र शाळांचा (मराठी माध्यम) निकाल ६२.५० टक्के एवढा आहे. उर्दू माध्यमाचा निकाल ९७.७८ टक्के, इंग्रजी माध्यमाचा निकाल ९२.४७ टक्के आणि हिंदी माध्यमाचा निकाल ५९.३७ टक्के लागला आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ