
डिजिटल युग अधिक प्रगत होत आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग राहावे, असे आवाहन नॅस्कॉमचे अधिकारी प्रसाद देवरे यांनी सांगितले.
‘टेक-वारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘सायबर सुरक्षा’ विषयावर प्रसाद देवरे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वरे म्हणाले, डीप फेक व्हिडीओ, डेटा चोरी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा. सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा तसेच दुहेरी प्रमाणीकरण प्रणाली वापरा. अनोळखी व्यक्तींचे ई-मेल, मेसेजमधील लिंक्स उघडू नका. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि ‘आयओटी’ डिव्हायसेसचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा. सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्या. बँकिंग किंवा खरेदीसाठी फक्त बँक किंवा अधिकृत प्रदात्यांचे ॲप्स वापरा.
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे कोणताही संशयास्पद मजकूर किंवा संदेश फॉरवर्ड करताना प्रत्येकाने अत्यंत सतर्क राहावे. सायबर सुरक्षेसाठी काळजी घेणे ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ