
जम्मू पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला. आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आली आणि विशेष म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला.
1971च्या युद्धानंतर भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय हवाई दलाने आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
Please Share and like us: