
21 एप्रिल 2025 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी निवड झालेल्या प्रतिक्षा यादी टप्पा क्रमांक 2 मधील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता 21 एप्रिल 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
याआधी ही अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली होती. मात्र काही पालकांनी अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे ही मुदत एक आठवड्याने वाढवण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करून घ्यावा. ही मुदतवाढ ही अंतिम आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षेस यांनी केले आहे.