
गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ठाण्यात कोपीनेश्वर मंदिर येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात येते. या शोभयात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. शेकडो ठाणेकर नागरिक या शोभयात्रेत सहभागी झाले होते.
या शोभयात्रेत आ. केळकर यांनी लेझिम वर ताल धरून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. वारकरी दिंडीमध्येही सहभागी झाले. चिंतामणी जांभळी नाका येथे शोभा यात्रेवर आ. केळकर यांनी पुष्पवृष्टी केली व तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार घातला. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.
या शोभयात्रेत सहभागी होत असताना आ. केळकर यांनी कोपीनेश्वराचे दर्शन घेतले व
नागरिकांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

लोढा अमरा येथील नववर्ष शोभायात्रेत आ. केळकर यांनी सहभाग घेऊन नागरिकांना दिल्या शुभेच्छा. लोढा अमरा येथील नागरिकांनी एकत्रित हिंदू नववर्षाची स्वागत यात्रा काढली. आ. केळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शोभयात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत लाठीकाठी, लिझीम, वारकऱ्यांची दिंडी असे मराठं मोळे खेळ आयोजित केले होते. आ. केळकर यांनी यात सहभाग घेतला व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
