
सत्यघटनेवर आधारित ‘आता थांबायचं नाय!’ या शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रूपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मराठी चित्रपट नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आता त्याच टायटल गाणं देखील प्रसिद्ध झालं आहे. जे सर्वाना मंत्रमुग्ध करत आहे
महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.