Related posts:
Please Share and like us:
Voice of Thane |
यावेळी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जलकुंभाचे पूजन केले आणि अन्तराष्ट्रीय जल दिवस म्हणून पाणी पुरवठा विभागाने पाणी बचतीसाठी अधिकारी आणि कर्मचारी शपथ घेतली.
ठाणे : शहराला मुबकल आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि ते कायम करत आलो आहेत. यापुढे ही करत राहणार असल्याचे उद्गार ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी जल दिनी बोलताना काढले. तसेच पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याने ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी आहे.
ठाण्यात आयोजित केलेल्या जल दिनानिमित्त एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता पवार यांनी ठाणेकर नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुढे बोलताना, पवार यांनी ठाणे महापालिकेची पाण्याची गरज ही 616 दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, सद्यस्थितीत ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी लक्षात घेता, पुढील 2055 सालापर्यंत लागणाऱ्या पाण्यासाठी विविध स्रोतामार्फत पाणी पुरवठ्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा आणि जोरदार प्रयत्नही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब च्या आशीर्वादाने महापालिका आयुक्त श्री सौरभ राव साहेब च्या मार्गदर्शन मधे सुरू आहेत. तसेच त्या प्रयत्नांना या काळात निश्चित यश येईल. असा विश्वास ही पवार बोलून दाखवला.
त्यातच ठाणे शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र सद्यस्थितीत ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. ह्या वेळी उपनगर अभियंता विकास ढोले, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी मनीषा प्रधान, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी, प्रशांत फिरके, हनुमंत पांडे, प्रशांत भुवड, शशिकांत साळुंखे सहित अन्य अभियंता व कर्मचारी आदि उपस्थित होते.
: ठाणे रेडिओ